दुबईवरुन दोन शेखने आणले एक कोटींची सोन्याची बिस्किटे, औरंगाबाद विमानतळावर झाले चतुर्भूज

Foto

औरंगाबाद – येथील चिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना दोन तस्करांना रंगेहात पकडण्यात आले आहे. अबुधाबी येथून आणलेली सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले असून सोने तस्कर शेख जावेद शेख इस्माईल आणि अब्दुल फय्युम या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

अशी मिळाली माहिती

दिल्ली – औरंगाबाद विमानाने दोन सोने तस्कर चिकलठाणा विमानतळावर येत असल्याची माहिती मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना मंगळवारी दिली. विमान सायंकाळी साडेसहा वाजता लँड होणार होते. औरंगाबादच्या कस्टम अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करत दोन तस्करांना विमानतळावरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३ किलोची सोन्याची बिस्किटे सापडली.

 

औरंगाबाद कस्टम अधिकाऱ्यांनी रचला सापळा

चिखलठाणा विमानतळावर दिल्ली-औरंगाबाद या एअर इंडियाच्या विमानाने चोरीचे सोने आणले जात असल्याची माहिती मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील अधिकाऱ्यांना कळविली होती. औरंगाबादच्या कस्टम अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत चिकलठाणा विमानतळावर सापाळा रचला. दिल्ली-औरंगाबाद विमान मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता चिकलठाणा विमानतळावर लँड झाले. कस्टम अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रवाशावर करडी नजर ठेवून दोन प्रवाशांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतली.  त्यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे तीन किलो बिस्किटे आढळून आल्याने त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. याबाबत अधिकाऱ्यांनी कमालीचे गुप्तता पाळली होती. स्थानिक पोलिस तसेच केंद्रीय औद्योगिक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आलेली नव्हती. अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या दोन तस्करांची बुधवारी सकाळपर्यंत कसून चौकशी सुरु होती.